• Film-Academy-Course-Modules-Improvisation
 • Film-Academy-Course-Modules-Film-Appreciation
 • Film-Academy-Course-Modules-Dubbing
 • Film-Academy-Course-Modules-Mime
 • Film-Academy-Course-Modules-Fight-Technique
 • Film-Academy-Course-Modules-Lights
 • Film-Academy-Course-Modules-Dance-Fundamentals
 • Film-Academy-Course-Modules-Makeup-Session
 • Film-Academy-Course-Modules-Performance
 • Film-Academy-Course-Modules-Film-Making-Process
 • Katthak Classes Kolhapur
 • Western Dance Classes Kolhapur
 • Western Dance Classes Kolhapur
 • Tablaa Classes Kolhapur
 • Harmonium Classes Kolhapur
 • Drawing Classes Kolhapur
 • Bharatnatyam Classes Kolhapur
 • Bharatnatyam Classes Kolhapur
Bhalji Pedharkar

भालजी पेंढारकर सांस्कॄतिक केंद्र

उद्देशः

 • ललितकलांद्वारे भारतीय संस्कृती्ची ओळख, संवर्धन व संरक्षण करणे. ललितकलांचा विकास साधणे.
 • भालजी पेंढारकरांचे जीवन कार्य व चरित्र दर्शविणारे कायमस्वरुपी दालन करणे.
 • कोल्हापुर जिल्हातील सर्व कलाकारांचे जीवनचरित्र छायाचित्रे, चित्रपट, ध्वनीफिती, चित्रफिती, कलाकॄती यांचे संकलन, प्रदर्शन व संग्रहालय करणे.
 • सर्व माध्यमांसाठी शोध प्रकल्प, संशोधन स्तरावर कार्य करणे.
 • कलामाध्यामातील शोध प्रकल्प, चित्रफिती, ध्वनीफिती यांचे संपादन, प्रकाशन, ग्रंथनिर्मिती करणे.
 • कलादालन, ग्रंथालय, द्रुकश्राव संग्रहालय करणे.
 • चर्चासत्रे, व्याख्याने, परिसंवाद, कार्यशाळा, प्रदर्शन महोत्सवाद्वारे कलेची आवड निर्माण करणे.
 • द्रुककला व क्रियाशील कला, चित्रपट, दिग्दर्शन यांचे प्रशिक्षण, देणे.
 • क्रियाशील कलामाध्यामातुन प्रयोगक्षम निर्मिती, प्रदर्शन करणे.

हेतु:

मानवाच्या प्रत्येक धडपडीत एकमेव उदिष्ट असते, आत्मविष्कार. कलामधुन हाच आत्मविष्कार सुरवात रुपात घडतो. त्याकरिता आपले व्यक्तिमत्त्व बहुविध अंगानी सकस बनविने आवश्यक असते. ज्या्चा आविष्कार करावयाचा त्याचे प्रकटन तितकेच नेटके व टोकदार होण्यासाठी तपश्चर्येची गरज आहे. परंतु केवळ तपश्चर्या किंवा केवळ प्रतिभा हे साधु शकत नाही. त्याचा सुयोग मेळ घालण्यास बालपणापासुन स्वतःशीच झगडावे लागते. त्यातुनच मायकेल एंगेलोने म्ह्ट्लेला अनावश्यक संगमरवर हळूवारपणे दूर होतो शिवाय कलामाध्यमातुन होणारा आविष्कार ही एक नवनिर्मिती असते. निर्मात्यास नव्हे तर आस्वादकासही एका वेगळ्या विश्वात घेऊन जाते. मनुष्याच्या जडणघडणीत कलांचा महत्वाचा वाटा असून संस्कारक्षम वयातच कलामाध्यमातुन संस्कार घडविल्यास त्यांचा मानसिक व भावनिक विकास साधुन त्यांचे व्यक्तिमत्त्व संपन्न करता येईल. त्यातुनच भावी कलावंत, रसिक, उत्तम माणूस निर्माण होईल.


संकल्पित योजना

कोल्हापुर कलादालनः

 • कोल्हापुरातील चित्रकार, शिल्पकार, छाया्चित्रकार यांच्या कलाकॄती.
 • चित्रकार, शिल्पकार, साहित्यिक, नाट्य, चित्रपट निर्माते, दिग्दर्शन, कलादिग्दर्शन, संगीतकार, गायक वादक, अभिनेते अभिनेत्री, कलाकार, तंत्रज्ञ यांची छायाचित्रे.
 • कोल्हापुरचा सांस्कॄतिक इतिहास दर्शन घडविण्यार्‍या प्रमुख स्थळांची छायाचित्रे.

संशोधनः

 • कोल्हापुरात आजवर होऊन गेलेल्या व आज असण्यार्‍या सर्व ललित कलातील कलावंतांची सूची तयार करणे.
 • कलावंतांचे जीवन कार्य, माहिती, चरित्र, कागदपत्रे, कलाकॄती यांची संशोधनपूर्वक माहिती तयार करणे.
 • कलावंतांचे जीवनावर चित्रफिती, ध्वनीफिती तयार करणे.
 • शोध प्रबंध तयार करणे किंवा शोधाभ्यासकास अनुदान तसेच शिष्यवॄत्तीच्या माध्यमातुन सहाय्य करणे.
 • सर्व कलावंतांची अध्यावत अशी संगणकीय व् मुद्रित माहीती संकलित करणे.

प्रकाशनः

 • भालजी पेंढारकर सांस्कॄतिक केंद्राचे मासिक, मुखपत्र काढणे.
 • संशोधन विभागातून तयार होणारे सहित्य प्रकाशित करणे. त्याचे वितरण करणे.
 • कलावंत व कलाकृतींवर आधारित चित्रफिती, ध्वनीफिती, सी. डी., व्ही. सी. डी., आदींची निर्मिती करणे.

ग्रंथालयः

 • चित्र, शिल्प, वास्तु. नॄत्य, संगीत, साहित्य, चित्रपट या अभिजात कलांवरील विविध भाषांतील संर्दभ गंथ जमा करणे व ग्रंथालय तयार करणे.

द्रुक श्राव्य संग्रहालय:

 • अभिजात कलांतील चित्रफिती, ध्वनीफिती, सी. डी., व्ही. सी. डी., विविध भाषी अभिजात नाट्के, चित्रपट, संगीत, मैफिली, अनुबोधपट यांचे संग्रहालय तयार करणे.
 • अभ्यासकास संग्रहालयात याचा अनुभव घेता येण्याची सुविधा करणे.

नाट्य, चित्रपट गॄह- सभागॄह

 • विविध व्याखाने, चर्चासत्रे, परिसंवाद, संगीत सभा, नाट्यप्रयोग, चित्रपट आदि कार्यक्रमांसाठी सर्व सुविधासह असे किमान ४५० ते ५०० आसने व्यवस्थेचे सभागॄह.

शैक्षणिक

 • चित्र, शिल्प, नॄत्य, संगीत-गायन-वादन, चित्रपट व प्रसार-माध्यम इ. विषयाचे नैत्तिक शैक्षणिक अभ्यासक्रम सुरु करणे.
 • वय वर्षे ६ ते १४ वयोगटासाठी मुक्तछंद बालकला वर्ग. मुलांच्यातील सुप्त गुणांना वाव देणे व कलाभिरुची वृध्दिंगत करणे.
 • प्रमाणपत्र, पदविका, पदवी. पदव्युतर अभ्यासक्रमांची रचना करुन स्वायत्त कलाशिक्षणाची सोय करणे.
 • कलाभिव्यक्ती व समॄध्द अभिरुचीसाठी विविध चर्चासत्रे, कार्यशाळा , परिसंवाद, व्याखाने, स्पर्धा आदींचे आयोजन करणे.
 • लोककलांच्या स्वतंत्र अभ्यासक्रमाची सुविधा करणे.

वस्तीगृह - निवासिका:

 • किमान ५० प्रशिक्षणार्थीसाठी वस्तीगृह.
 • कलाभ्यासकांसाठी निवासी अभ्यासिका.
 • अभ्यागतांसाठी अथिती निवास.

ध्वनीमुद्र्ण व संकलन व पुर्नध्वनीमुद्र्ण स्टुडिओ:

 • चित्रपट व प्रसारमाध्यमांसाठी ध्वनिमुद्र्ण, पुर्नध्वनीमुद्र्ण व संकलन स्टुडिओ, निर्मिती व प्रशिक्षण सुविधा.
 • नाट्यचित्रपट व तद्नषंगिक साहित्य सामुग्रीची विध्यार्थी व व्यावसायिकांसाठी सुविधा उपलब्ध करणे.

व्यवस्थापन:

 • सांस्कॄतिक केंद्राचे कार्य सुविहितपणे चालविणेसाठी प्राध्यापक, आध्यापक, लेखापाल, गंथपाल, कर्मचारी, सेवक आदि आवश्यक अशी व्यवस्थापकीय व्यक्तींची नियुक्ती करणे.

निधी:

 • केंद्र स्वयंपुर्ण होणेसाठी विविध उपक्रम, कार्यक्रम, देणगी, आदीतुन निधी उभारणे व त्याचा विनियोग करणे.