• Film-Academy-Course-Modules-Improvisation
 • Film-Academy-Course-Modules-Film-Appreciation
 • Film-Academy-Course-Modules-Dubbing
 • Film-Academy-Course-Modules-Mime
 • Film-Academy-Course-Modules-Fight-Technique
 • Film-Academy-Course-Modules-Lights
 • Film-Academy-Course-Modules-Dance-Fundamentals
 • Film-Academy-Course-Modules-Makeup-Session
 • Film-Academy-Course-Modules-Performance
 • Film-Academy-Course-Modules-Film-Making-Process
 • Katthak Classes Kolhapur
 • Western Dance Classes Kolhapur
 • Western Dance Classes Kolhapur
 • Tablaa Classes Kolhapur
 • Harmonium Classes Kolhapur
 • Drawing Classes Kolhapur
 • Bharatnatyam Classes Kolhapur
 • Bharatnatyam Classes Kolhapur
Bhalji Pedharkar

चित्रतपस्वी भालजी पेंढारकर

Bhalji Pendharkarभालचंद्र् गोपाल पेंढारकर म्हणजेच भालजी पेंढारकर यांचा जन्म ३ मे १८९८ रोजी कोल्हापुरात झाला. लहानपणापासुनच अलिप्तपणे जीवनाचा विचार करण्याची स्वतंत्र वॄती होती. सदगुरु सदानंद महाराजांचा बालवयातच सहवास लाभला. स्वातंत्र्य चळवळीत बाबाराव सावरकरांसारख्या स्वातंत्र्यवीरांच्या कार्यात सहभागी होत असतानाच हिंदवी स्बराज संस्थापक युगपुरुष छ्त्रपती शिवाजी व युगंधर भगवान श्रीकृष्ण ही त्याची आराध्य दैवते बनली. नाट्यलेखन करीत असतानाच मुकपटांच्या टायटल्स लिहिण्याचे काम केले आणि पुढे स्वतंत्र चित्रपट निर्मितीस सुरुवात केली. देव, देश आणि धर्म जीवनाची त्रिसुत्री घेऊन वयाच्या ९६ व्या वर्षापर्यत त्यांनी अखंडपणे चित्रपट निर्मिती केली. दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद गीते यातून मनोरंजनाबरोबरच समाज प्रबोधनाचे महत्वाचे कार्य केले. विशेषतः ऐतिहासिक चित्रपटाव्दारे स्वातंत्र्यपुर्व काळात महाराष्ट्राची अस्मिता व राष्ट्र्भक्ती चित्रपट माध्यामातुन समाजात रुजवली. त्यांचे कार्य लक्षात घेऊन भारत सरकारने दादासाहेब फाळ्के पुरस्कार देऊन सन्मानीत केले. असे हे थोर व्यक्तिमत्व दि. २६ नोव्हेंबर १९९४ रोजी काळाच्या पडध्याआड अंतर्धान पावले.

भुमिकाः

कोल्हापुर शहारास धार्मिक, राजकिय, ऐतिहासिक, सामाजिक इतिहास आहे तसा सांस्कॄतिक इतिहासही समृध्द आहे. चित्रकला, शिल्पकला, संगीत. साहित्य, रंगभुमी याबरोबरच चित्रपट यांचे या इतिहासात मोठे योगदान आहे. सामाजिक जडणघडणीत कलामाध्यमातुन सांस्कॄतिकता आणि संस्कृती घडत जाते. ती घडविणार्‍या अनेक कलावंत, तंत्रज्ञांच्या कार्यकतृतत्त्वानेच कोल्हापुरला कलापुर असे नामविधान प्राप्त झाले. याचे पुर्वश्रेय राजश्री छ्त्रपती शाहु महाराज यांच्याकडे जाते. त्यांची रसिकता व प्रोत्साहन यामुळे या भुमीत जे अनेक कलावंत घडले, त्या अग्रणींपैकी चित्रतपस्वी स्व. बाबा तथा भालजी पेंढारकर हे एक महत्वपुर्ण नाव आहे. त्यांनी आपल्या दीर्घायुषी जीवनात देव, देश आणि धर्म ही त्रिसुत्री जपली. विचारवंत, तत्त्वज्ञ, राष्ट्र्भक्त कलावंत या नात्याने त्यानी निर्माण केलेल्या सर्व चित्रपटांतुन आपल्या त्रिसुत्री विचारप्रणालीद्वारे सातत्याने समाज प्रबोधन विचार, संस्कार आणि शिक्षण हे मनोरंजना्च्या माध्यमातुन दिले. तो सर्व ठेवा सांस्कॄतिक वारसा आहे. त्याचे संवर्धन, संरक्षण करीत भावीपिढी सॄजनशील, सजनशील, क्रियाशील व संस्कारक्षम घडावी या भुमिकेतुनच भालजी पेंढारकर सांस्कॄतिक केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.